Ad will apear here
Next
ठाण्याचा यश खेळणार राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत
ठाणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे नुकत्याच जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ठाणे पूर्व परिसरात राहणाऱ्या यश अजित शिंदे याने त्यात चमकदार कामगिरी केली असून, त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.

यश ज्ञानसाधना महाविद्यालयात बारावीत शिकतो. त्याने १९ वर्षांखालील गटात जिम्नॅस्टिक स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक, तर ‘करिअर एक्सरसाइज’मध्ये रौप्यपदकाची कमाई केली. 

‘ऑल राउंड’मध्ये त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. त्यामुळे त्रिपुरा येथे डिसेंबर २०१८मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्यामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPPBU
Similar Posts
‘आधुनिकतेने हिरावले संस्कार’ ठाणे : ‘माणसांनी तांत्रिक बाबींमध्ये प्रगती केली खरी; पण त्याचसोबत गेल्या काही वर्षांपासून आलेल्या आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे देशाचे भविष्यनिर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीसह आपल्याही संवेदना, गांभीर्य कमी होत आहे,’ अशी खंत ‘तारक मेहता
ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्ततेचे संकेत ठाणे : गेल्या काही वर्षांत ठाणे खाडी प्रदूषणाच्या गर्तेत अडकल्याचे चित्र दिसत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे या खाडीची प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नुकतेच या खाडीत दोन श्वानमुखी सर्प आढळले. हे निमविषारी सर्प मध्यंतरीच्या काळात या खाडीत दिसत नव्हते
कोपरीची चौपाटी बनणार इतिहासाची साक्षीदार ठाणे : ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संरक्षण होणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्त्व विभाग, ठाणे महानगरपालिका, मेरिटाइम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. कोपरी येथील खाडीकिनारी मातीमध्ये गाडण्यात आलेल्या
... आणि बगळ्याला मिळाले जीवदान ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण घड्याळाच्या काट्यावर चालतात. त्यामुळे दुसऱ्याला मदत करायला वेळ कोणाकडेच नसतो. प्राणी-पक्ष्यांना मदत करणे ही तर खूप दूरची गोष्ट. असे असले तरी काही चांगली उदाहरणेही समाजात अधूनमधून पाहायला मिळतात. तसेच एक उदाहरण नुकतेच ठाण्यातही पाहायला मिळाले. येथील एका युवकाने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language